*रस्त्यावर दुबार मंजूर झालेल्या कामांचे तुकडे न करता निविदा रद्द करा-विशाल देसले

*रस्त्यावर दुबार मंजूर झालेल्या कामांचे तुकडे न करता निविदा रद्द करा-विशाल देसले



पिंपळनेर,दि.28(अंबादास बेनुस्कर)सार्वजनिक बांधकाम विभाग धुळे यांच्याकडून काल 27 ऑगस्ट 2024 रोजी ई-निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे.त्या निविदे मधील सर्व कामे एकाच रस्त्यावर 4 ते 5 तुकडे करण्यात आलेले आहे. हिवाळी अधिवेशन 2023-24 मध्ये साक्री तालुक्यातील आदिवासी भागातील नवीन रस्ते व पुलांचे कामे मंजूर झाली होती.त्या कामांवर सार्वजनिक बांधकाम विभाग कडून एकाच रस्त्यावर 4 ते 5 तुकडे करून 10 ते 11 लाख रुपयांचे अंदाजपत्रक करण्यात आले आहे.या कामात काय गौडबंगाळ आहे याची खात्री करण्यासाठी मा.अधिक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता सा.बा.विभाग धुळे यांना 22 डिसेंबर 2023 रोजी निवेदन दिले होते व हे एका रस्त्यावरचे सर्व काम एकत्र करून निविदा प्रसिद्ध करावी अशी विनंती केली होती परंतु सा.बा.उपविभाग पिंपळनेर यांच्याकडून शासनाचे सर्व नियम मोडून ठेकेदांकडून टक्केवारी खाण्याच्या उद्देशाने 10 लाखाचे तुकडे करण्यात आले आहेत.कालच प्रसिद्ध झालेल्या ई-निविदा क्र.12 मध्ये सुमारे 57 कामे घेण्यात आलेली आहेत व ई-निविदा क्र.11 सन 2024-25 मध्ये 11 कामांचा समावेश केला आहे. महोदय सदर प्रकरणाची चौकशी करून निविदा रद्द करण्याचे त्वरित आदेश द्यावे व एकच रस्त्यावर सर्व कामे एकत्रित ई-निविदा प्रसिद्ध करण्याच्या सूचना द्याव्या. सदर गंभीर प्रकारात शासनाच्या नियमांचे उल्लंघन करण्याऱ्यावर कडक कार्यवाही करावी अशी मागणीही निवेदनातून विशाल देसले यांनी केली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

poads

new