कान नदीच्या पुरात चार जण गेले वाहून ! तिघांना वाचविण्यात यश;महिला बेपत्ता

कान नदीच्या पुरात चार जण गेले वाहून ! तिघांना वाचविण्यात यश;महिला बेपत्ता


पिंपळनेर,दि.26(अंबादास बेनुस्कर)



साक्री तालुक्यातील अष्टाणे येथे आज सकाळी कान नदीत चार जण वाहून गेल्याची घटना घडली.सुदैवाने तीन जणांना वाचविण्यात यश आले असून एक महिला अद्याप बेपत्ता आहे.गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरु असल्याने नदी,नाले,प्रकल्प तुडूंब भरुन वाहत आहेत. तालुक्यातील मालनगाव प्रकल्पातूनही कान नदीत पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे नदीला पूर आला आहे.आज सकाळी अष्टाणे-विजयपूर शिवारातील कान नदीत स्थानिक रहिवासी असलेले दोन महिला व दोन पुरुष वाहून गेल्याची घटना घडली.या नदीला पूर आला असताना व पुलावरुन पाणी वाहत असताना ते नदी पार करत होते.यावेळी सिताराम काशिराम सुळ,गोझरबाई सिताराम सुळ,देवा काळू वयकर या तिघांना वाचविण्यात यश आले.तर ओझरबाई देवा वयकर ही महिला वाहून गेली आहे.तिचा शोध घेण्याचे काम सुरु होते. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे एपीआय अनिल बागुल, पीएसआय संसारे,पोकों काकडे,पोकॉ खैरनार हे घटनास्थळी दाखल झाले होते. तसेच घटनेची माहिती तातडीने राज्य आपत्ती दलास माहिती देण्यात आली.त्यानुसार आपत्ती दलाची टीमही घटनास्थळाकडे रवाना झाली होती.

Post a Comment

أحدث أقدم

poads

new