*श्रीक्षेत्र मुरलीधर मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सवात;आज कुस्त्यांची दंगल

*श्रीक्षेत्र मुरलीधर मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सवात;आज कुस्त्यांची दंगल



पिंपळनेर,दि.28(अंबादास बेनुस्कर)येथील श्री क्षेत्र मुरलीधर मंदिरात सालाबादप्रमाणे यंदाही गोकुळाष्टमी उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला.भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव हाथी घोडा पालकी...जय कन्हैया लाल की...असा कसा देवाचा देव लंगडा देव एका पायाने लंगडा..अशा भक्ती गीताच्या चालीवर थिरकत गुलाबाची व फुलांच्या पाकळ्यांची उधळण करीत जन्माष्टमी साजरी करण्यात आली.श्री मुरलीधर मंदिरात गोकुळाष्टमी निमित्ताने हभप अनंत महाराज काळे संगमनेरकर यांचे कीर्तनाने ह्या कार्यक्रमाची शोभा वाढली.श्री मुरलीधर मंदिराच्या गर्भगृहातून सजविलेल्या टोपलीत भगवान श्रीकृष्णाची बाल मूर्ती झाकून पुरोहित गोविंद आचार्य यांनी झुलता पाळणापर्यंत आणली.बरोबर रात्रीच्या 12 वाजता जन्माष्टमी उत्सव पाळणादोरी ओढून पाळणा हलविण्यात आला.यावेळी शेकडो भाविकांनी गुलाल फुलांच्या पाकळ्या उधळण करून साजरा करण्यात आला. गावातील महिला भक्तांची मोठी गर्दी होती.परिसरातील भाविक सहभागी झाले होते. रात्री भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आला. 

यावर्षी श्री मुरलीधर मंदिर संस्थांतर्फे 117 वा अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा साजरा झाला.सतत आठ दिवस विविध सांस्कृतिक व अध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वेगवेगळ्या जिल्ह्यातील कीर्तनकारांनी कीर्तन सेवा दिली.यातून समाजप्रबोधन व तरूण पिढीला उपदेश तसेच धर्माचे महत्त्व व जीवनात करावयाचे कर्म याविषयी चिंतनात्मक विचार मांडून समाजप्रबोधन केले.मंदिराच्या विश्वस्त मंडळ,समाजातील तरूण मंडळ,तसेच भजनी मंडळ,यांनी परिश्रम घेतले. कीर्तनकार महाराज व सहकार्य करणारे महाराज,संताना वस्रदान व बिदागी ही देण्यात आली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

poads

new