नांदगाव येथे आमदार सुहास आण्णा कांदे यांनी उभारण्यात आलेल्या शिवसृष्टीचा व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याचा आज राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेबांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न झाला.

नांदगाव येथे आमदार सुहास आण्णा कांदे यांनी उभारण्यात आलेल्या शिवसृष्टीचा व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याचा आज राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेबांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न झाला.



यावेळी मुख्यमंत्री साहेबांप्रति जनमानसात असलेल्या प्रेम भावनेची आज याची देहा याची डोळा प्रचिती आली. नजर जाईल तिथपर्यंत केवळ मुख्यमंत्री साहेबांचे स्वागत करण्यासाठी जमलेले नागरिक भविष्यातील महाविजयाचे जणू संकेत देत होते. या लोकार्पण सोहळ्या प्रसंगी झालेले मुख्यमंत्री साहेबांचे आजचे स्वागत कायम संस्मरणीय राहील. यानंतर ढोल ताशांच्या गजरात, फुलांची उधळण करत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि शिवसृष्टीचे लोकार्पण करण्यात आले. नांदगाव शहरासाठी आजचा दिवस अत्यंत भाग्याचा असून शिवछत्रपतींची शिवसृष्टी नांदगावात उभारली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे राज्याचे आराध्य दैवत असून त्यांनी दाखवलेल्या मार्गावरच महायुतीचे सरकार काम करत असल्याचे यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी सांगितले. राज्यातील शेतकरी, महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक सर्वांसाठी राबविण्यात येत असलेल्या अनेक कल्याणकारी योजनांची माहिती दिली. तसेच नांदगाव शहराच्या विकासासाठी भरीव निधी देण्याबरोबरच येथील सर्व प्रश्न मार्गी लावण्यात येतील असेही मुख्यमंत्री साहेबांनी यावेळी सांगितले.

युसुफ पठाण प्रतिनिधी मालेगाव नासिक 

व्हाट्सअप नंबर 9763265211

Post a Comment

أحدث أقدم

poads

new