तलाठींचे काम बंद;संतोष पवार यांच्या निघुण हत्येचा व्यक्त केला तीव्र निषेध

तलाठींचे काम बंद;संतोष पवार यांच्या निघुण हत्येचा व्यक्त केला तीव्र निषेध



पिंपळनेर,दि.29(अंबादास बेनुस्कर)

आडगाव रंजे(ता.वसमत जि. हिंगोली)येथील संतोष देवराम पवार यांची तलाठी कार्यालयातच निघृण हत्या करण्यात आली.हा प्रकार अत्यंत भ्याड,निंदनीय व घृणास्पद आहे.या घटनेचा धुळे जिल्हा तलाठी संघाने अत्यंत तीव्रसंवेदनशील व दुःखद भावनेने निषेध व्यक्त केला. तसेच एक दिवसीय काम बंद ठेवत लक्षवेधी आंदोलन करण्यात आले.पुन्हा अशा घटना होऊ नये म्हणून हे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून आरोपीस अत्यंत कठोर शिक्षा द्यावी,अशी मागणी साक्री तालुका तलाठी संघातर्फे करण्यात आली.याबाबत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की,वास्तविक फेरफार प्रलंबित असल्याने खुन अशा प्रकारच्या बातम्या पसरविल्या जात आहे.मात्र सबंधित व्यक्तीचे कोणत्याही प्रकारचे फेरफार प्रकरण तलाठी यांच्याकडे प्रलंबित नव्हते.केवळ आपल्या कुटुंबातील शेतजमीन नातेवाईक कुणालातरी हाताशी धरून परस्पर त्यांच्या नाव करून घेतील काय? अशा संशयावरून आरोपीने तलाठी देवराव पवार यांचा खून केला. या घटनेमुळे तालुक्यातील तलाठीच नव्हे तर संपुर्ण सरकारी कर्मचाऱ्यांचे खच्चीकरण झाले असुन कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या गुन्ह्यातील आरोपीला जास्तीत जास्त कडक शिक्षा व्हावी या दृष्टीने पोलीस प्रशासनाकडून प्रयत्न व्हावे.हे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून व तज्ञ,जेष्ठ सरकारी विधीज्ञामार्फत कायद्यानुसार कमाल शिक्षा देण्यात यावी,या साठी शासनाकडून प्रयत्न व्हावे.मयत तलाठी यांच्या कुटुंबीयास किमान 50 लाख रुपयाची विशेष मदत शासनाने त्वरित जाहीर करावी. भविष्यात त्यांच्या कुटुंबियांच्या उदरनिर्वाहासाठी त्यांच्या वारसांना अनुकंपाद्वारे तत्काळ शासकीय सेवेत समाविष्ट करून घ्यावे.या सारख्या घटना व सरकारी कर्मचाऱ्यांवर वारंवार होणारे हल्ले होवु नये, यासाठी कायद्यात दुरुस्ती करून कलम 353 हे अजामीनपात्र करण्यात यावे. या सारखे इतर काही कायदे अस्तित्वात आणून कर्मचाऱ्यांना सुरक्षा देण्याबाबत गांभीर्याने विचार व्हावा व संरक्षण मिळावे,अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

Post a Comment

أحدث أقدم

poads

new