महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांच्या हस्ते निवडपत्र प्रदान चंदन पवार यांनी

बुद्धीजीवी प्रकोष्ठ उत्तर महाराष्ट्राच्या अध्यक्ष पदी" चंदन पवार यांची निवड.*महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांच्या हस्ते निवडपत्र प्रदान चंदन पवार यांनी राजकारणाची सुरवात करतांना 2013 मध्ये आप मध्ये प्रवेश केला होता त्यानंतर त्यांना विविध पदांवर काम करण्याची संधी मिळाली होती, आम आदमी पार्टीची सत्ता नसल्यामुळे ज्या वेगाने जनतेची कामे व्हायला हवी होती ती होत नव्हती म्हणून कामाचा दृष्टिकोन ठेवून त्यांनी चार महिन्यापूर्वी भाजपामध्ये प्रवेश केला होता, पवार यांच्या सामाजिक कामाची दखल घेत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि महाराष्ट्र प्रदेश संयोजक अजित चव्हाण यांनी, उत्तर महाराष्ट्राच्या बुद्धीजीवी प्रकोष्ठ “संयोजक”पदी पवार यांची निवड केली आहे, पवार यांच्याकडे याआधी नमो विचार मंचच्या महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्ष पदाचीही जबाबदारी आहे.


 

यानिमित्त पवार यांनी मिडियाशी बोलतांना सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी आपल्या कार्यकाळात 370 कलम हटविले, तीन तलाक आणि राम मंदिर यासारख्या प्रश्नांवर क्रांतिकारक निर्णय घेतले आहेत, अनेक जनहिताच्या योजना त्यांनी लॉन्च केल्या, भारत देशाचे नाव त्यांनी जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविले, यापुढेही देशाच्या भल्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यात असल्यामुळे मी भाजपात आलो आहे आणि सत्तेवर असलेला पक्षात जनतेची कामे करता येतात हा अनुभव असल्यामुळे मी भाजपामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला, व्यवस्था परिवर्तन करण्यासाठी संधी मला भाजपाचे वरिष्ठ नेते देतील याची मला खात्री आहे, मी 10 टक्के राजकारण आणि 90 टक्के समाजकारण करण्याचा प्रयत्न करेन, याप्रसंगी भाजपा शहर अध्यक्ष प्रशांत जाधव, गुजरातचे मा. अध्यक्ष अमित भाई, मा.शहर अध्यक्ष लक्ष्मण सावजी, आमदार सिमाताई हिरे, भाजपा नेते दिनकर पाटील, नमो विचार मंचचे राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब बोडके, सुनील केदार, काशिनाथ शिलेदार, अनिता भामरे तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. 



युसुफ पठाण प्रतिनिधी मालेगाव नाशिक

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

poads

new