*मालवण येथील किल्ल्यावरील छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची निकृष्ट व भ्रष्ट मार्गानें झाल्यामुळे मुख्यमंत्री दोन्हीं उप मुख्यमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी
स्वीकारून राजीनामा देणे*
सिल्लोड (प्रतिनिधी) मालवण येथील किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे निकृष्ट आणि भ्रष्ट मार्गानें झालेल्या कामामुळे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यामुळे राज्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या मनाला तीव्र वेदना झाल्या असुन याप्रकरणाची निवृत्त न्यायाधीशा मार्फत चौकशी करून राज्याचे मुख्यमंत्री, दोन्हीं उपमुख्यमंत्री आणि बांधकाम मंत्री व पुतळा बांधण्याच्या कामांत सहभागी असलेले अधिकारी कर्मचारी यांनी तत्काळ नैतीक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे वतीने मुख्यमंत्र्या सह या मंत्री मंडळातील कोणत्याच मंत्र्याला रस्तावर फिरू देणार नाहीत असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष दत्तात्रय पांढरे यांनी दिला. तहसीलदार सिल्लोड यांना दिलेल्या निवेदनावर दत्तात्रय पांढरे, मा. तालुकाध्यक्ष अजित पाटील, शहराध्यक्ष शेख शाकेर, हरिदास साखले, गणेश बावस्कर,शेख कलीम पींजारी वो.बी.सि. ता.अध्यक्ष.शेख सलीम,शेख अझर,शेख वसिम,संदीप शिंदे,राहुल सुरडकर
, आदित्य फरकाडे,रामचंद्र गोरे, संदीप शिंदे, राहुल सुरडकर, अशोक लिंगायत, शेख वसीम, कलीम पिंजारी, योगेश राऊत इत्यादींच्या सह्या आहेत