*साथीदार फौंडेशनच्या वतीने शंभरावर विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

*साथीदार फौंडेशनच्या वतीने शंभरावर विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप 



पिंपळनेर,दि.28(अंबादास बेनुस्कर)शेणपूर ता.साक्री येथील श्री छत्रपती संभाजी माध्यमिक विद्यालय येथे साथीदार फाउंडेशनच्या वतीने दशकपूर्तीच्या पार्श्वभूमीवर विद्यालयातील गोरगरीब आदिवासी समाजातील सुमारे शंभरावर विद्यार्थ्यांना वह्या,पेन,पेन्सिल अशा स्वरूपाची शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी साक्री तालुका विधायक समितीचे चेअरमन सुजन सोनवणे होते.

कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून 

सरपंच अनिता काकुस्ते,ग्रा.पं. सदस्य पुनम काकूस्ते,निकिता काकुस्ते,जेष्ठ नागरिक विक्रम काकूस्ते,हरी काकूस्ते,माजी सरपंच चंद्रकांत काकुस्ते, माजी सरपंच तथा साथीदार फाउंडेशन उपाध्यक्ष कन्हैया काकुस्ते,साथीदार फौंडेशनचे अध्यक्ष सागर काकुस्ते,माजी सरपंच राजेंद्र काळे,साहेबराव काकुस्ते,राजेंद्र वाघ,ग्रा.पं. सदस्य भुर्या पवार,जगन्नाथ काकुस्ते,चंदू सोनवणे, बाजीराव सोनवणे,  मुख्याद्यापिका सविता काकुस्ते,कविता वाघ,सुभाष मोहिते आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मुख्याध्यापक जगदीश शिंदे यांनी साथीदार फाउंडेशनच्या मागील अनेक वर्षापासून सुरू असलेल्या या उपक्रमाचे कौतुक करताना गोरगरीब आदिवासी विद्यार्थ्यांसाठी दातृत्वाचा पुढे केलेला हात हा निश्चितपणाने विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी प्रेरणा आणि जागृती निर्माण करणारा आहे. यापुढे देखील साथीदार फाउंडेशनच्या वतीने शैक्षणिक साहित्य तसेच वृक्षारोपणाचा घेतलेला वसा अविरतपणे पुढे चालवावा अशी अपेक्षा व्यक्त केली. यावर साथीदार फाउंडेशनचे अध्यक्ष सागर काकुस्ते,उपाध्यक्ष कन्हैया काकुस्ते यांनी निश्चितपणाने फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी आवश्यक ती मदत सदैव उपलब्ध करून दिली जाईल असे आश्वासन दिले.

कार्यक्रम प्रसंगी विद्यालयातील पटांगणात निसर्ग संवर्धनाला उपयुक्त ठरणाऱ्या कडूनिंब, पिंपळ,आदी वृक्षांची लागवड देखील प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत करून घेण्यात आली.एवढेच नव्हे तर केलेली वृक्ष लागवड संवर्धनासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे आश्वासनही गावातील जेष्ठ नागरिकांनी यावेळी दिले.

 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयातील शिक्षक किशोर भामरे यांनी तर आभार आर एस काळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तुषार भामरे सूर्यकांत पवार चुनीलाल माळशे ज्ञानेश्वर पाटील नितीन भामरे संजय थोरात अंकुश राजपूत आदींंसह विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी परिश्रम घेतले.


फोटो. शेणपूर येथे शैक्षणिक साहित्य वाटप प्रसंगी उपस्थित विद्यार्थी आणि मान्यवर.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

poads

new