*राजकीय पक्षांना छत्रपतींचा पडला विसर...*

*राजकीय पक्षांना छत्रपतींचा पडला विसर...*


*आम आदमी पार्टीने नोंदविला निषेध..*

काल राजकोट किल्ल्यावरील शिवस्मारक कोसळले या घटनेचा आम आदमी पार्टी तर्फे आज दि.२७/८/२०२४ रोजी मा.तहसीलदार सो.चाळीसगाव जि.जळगाव यांना  निवेदन देऊन निषेध नोंदविण्यात आला.

यावेळी सरकार विरोधी घोषणा देऊन दुर्देवी घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला

दि. ४ डिसेंबर २०२३ रोजी भारतीय नौदल दिनाचे औचित्य साधून मालवण नजीक राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात आला होता. काल दिनांक २६/०८/२०२४ रोजी  सदर  पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.पुतळा बसवण्यापूर्वी शिवप्रेमींनी आवाज उठवून पुतळा आकारहीन व शिल्पशास्त्रास धरून नसल्याचे कळवले होते. परंतु सदर सूचनांकडे दुर्लक्ष करून सदर शिवस्मारकाचे घाई घाईने मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

सदरच्या शिव स्मारकासाठी महाराष्ट्रातील जनतेचे अडीच कोटी रुपये खर्चून जयदीप आपटे या अल्पअनुभवी कारागिराला काम दिले गेले. विद्यमान सरकारने फक्त  प्रसिद्धीसाठी देशातील कोट्यावधी शिवप्रेमींच्या भावना आज दुखावल्या आहेत. त्यामुळे आज आम्ही सदर घटनेचा जाहीर निषेध नोंदवितो 

तसेच  सदर दुर्दैवी घटनेला जबाबदार भ्रष्टाचारी कॉन्ट्रॅक्टर, अधिकारी व मंत्र्यांवर कठोर कारवाई व्हावी, हि नम्र विनंती आज आम आदमी पार्टी तर्फे करण्यात आली.सदर निवेदन तहसीलदार सो.यांचे मार्फत विकास लाडवंजारी यांनी स्वीकारले. यावेळी जिल्हाध्यक्ष 

अँड.राहुल जाधव, महिला अध्यक्ष अँड.कोमल मांडोळे, अँड.दिलीप निकम,अँड.साबीर सैय्यद, अँड.मयुर कुमावत, तालुका उपाध्यक्ष यासिन खान,वसीम शेख, अँड.शेखर चौधरी, शिवप्रेमी अँड.खंडू कोर,अरविंद पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم

poads

new