*नारपार गिरणा नदीजोड प्रकल्प रद्द केल्याने खान्देश हित संग्राम आक्रमक!*

*नारपार गिरणा नदीजोड प्रकल्प रद्द केल्याने खान्देश हित संग्राम आक्रमक!*



*धुळ्यासह शिरपूर,शिंदखेडा प्रशासनाला निवेदन ;राज्य शासनाचा केला निषेध*धुळे २८(गोकुळ देवरे) खान्देशवायांसाठी वरदान ठरणारा बहुप्रतिक्षित असलेला नारपार गिरणा नदीजोड प्रकल्प रद्द करण्यात आल्याने खान्देश हितसंग्राम संघटना आक्रमक झाली आहे. याविरोधात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकाच दिवशी धुळे जिल्हाधिकारी शिरपूर प्रांताधिकारी तसेच शिंदखेडा तहसीलदारांना निवेदन दिले. तसेच प्रकल्प रद्द केल्याबद़दल राज्य शासनाचा तीव्र निषेध केला.खान्देश हितसंग्राम संघटनेने प्रशासनाला निवेदनात म्हटले आहे की भारतातील आंतरराज्य  तसेच राज्यांतर्गत नदी जोड प्रकल्पाबाबत खा.अमोल कोल्हे व खा.भास्कर भगवे यांनी लोकसभेत प्रश्न उपस्थित केला होता.तेव्हा त्यावर उत्तर देताना केंद्रीय जल मंत्री यांनी उत्तर महाराष्ट्र खान्‍देशसाठी जलसंजीवनी ठरु शकणारा कर्मवीर स्व.भाऊसाहेब हिरे यांच्या संकल्पनेतील केंद्र व राज्य शासनाच्या विचाराधीन  असलेला तसेच मंजूरी व प्रत्यक्षात कामाला सुरुवात होण्याच्या प्रतीक्षेत असलेला नारपार गिरणा नदी जोड प्रकल्प रद्द करण्यात आल्याचे जाहीर केले. खान्‍देशच्या पाणीटंचाई समस्येवर व दुष्काळ निवारणार्थ वरदान ठरु शकणारा प्रकल्प म्हणून खानदेशातील शेतकरी व जनता गेले 60 वर्षांपासून प्रतिक्षा  करत  असताना केंद्र सरकारने अनपेक्षितपणे अचानक सदर प्रकल्प रद्द केल्याचे जाहीर केले.ही बाब  खान्‍देशी जनतेसाठी मोठा  धक्का असून सरकारने  खान्देशचा विश्वासघात व मोठा  अन्याय केला आहे.केंद्र शासनाच्या या कृतीच्या समस्त खान्‍देशी जनतेच्या वतीने खानदेश हितसंग्राम संघटना तीव्र जाहीर निषेध नोंदवित असल्याचेही निवेदनात नमूद केले आहे.

*प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावा!*

सदर प्रकल्प रद्द न करता तो त्वरित मंजूर करून लवकरात लवकर प्रकल्पाचे काम सुरू करावे अशी आग्रही मागणी देखील निवेदनातून करण्यात आली. शासनाचे प्रशासकीय प्रतिनिधी म्हणून आपण खान्‍देशी जनतेच्या  भावना शासनापर्यंत पोचवाव्यात.तसेच नारपारचे  हक्काचे 30  टीएमसी पाणी मिळायला पाहिजे शासनाने खान्देशवर अन्याय करणे बंद करावे,अशीही मागणी या निवेदनातून करण्यात आली. धुळे, शिरपूर व शिंदखेडा येथे निवेदन देतेवेळी खान्देश हितसंग्रामचे महाराष्ट्र प्रदेश  उपाध्यक्ष लिलाधर सोनार,महिला प्रदेश उपाध्यक्ष अनिता बैसाणे, सर्वेश पटेल,नरेंद्र देवरे, योगेश पाटील गायत्री शेलार आदी पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान,राष्ट्रीय पातळीवर

संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष भैय्यासाहेब पाटील,प्रवक्ते सुरेश पाटील मार्गदर्शक बापुसाहेब हटकर यांनीही सदर निवेदन दिले. शिवाय  कल्याण, ठाणे,पारोळा, जळगाव,मालेगाव,चाळीसगाव या ठिकाणीही 

संघटनेतर्फेनिवेदने देण्यात आली.तसेच नारपार गिरणा बचाव समितीने चाळीसगाव,मेहुनबारे येथे केलेल्या जलसमाधी आंदोलनातही संघटनेने सक्रीय सहभाग नोंदवला.

 

Post a Comment

أحدث أقدم

poads

new