*भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याची भव्य मिरवणुक जल्लोषात संपन्न...*

*भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याची भव्य मिरवणुक जल्लोषात संपन्न...*



*येत्या 29 ऑगस्ट रोजी आपल्या मालेगावातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा स्मारक सुशोभीकरण, क्रांतिज्योती सावित्रीआई फुले अभ्यासिका तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णकृती पुतळा स्मारक लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या महत्त्वाच्या सोहळ्याच्या अनुषंगाने आज छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार गिरणा पुल ते एकात्मता चौक, मालेगाव पर्यंत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याची भव्य मिरवणूक उत्साहात काढण्यात आली.*


*या भव्य मिरवणुकीत पालकमंत्री ना. दादाजी भुसे साहेब उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत, मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या सन्माननीय पदाधिकारी, नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी या मिरवणुकीचा आनंद घेतला.* एकात्मता चौक येथे या मिरवणुकीचा समारोप करण्यात आला. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पण करण्यात आली.


या सोहळ्याने संपूर्ण मालेगाव शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण केले असून 29 ऑगस्ट रोजी होणाऱ्या स्मारक लोकार्पण सोहळ्यासाठी सर्वत्र तयारी जोरात सुरू आहे.

Post a Comment

أحدث أقدم

poads

new