बुलढाणा वनपरिक्षेत्र अंतर्गत गिरडा बीट मधील गोंधळखेड शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात शेतकऱ्यांचा मृत्यू

बुलढाणा वनपरिक्षेत्र अंतर्गत गिरडा बीट मधील गोंधळखेड शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात शेतकऱ्यांचा मृत्यू


अजिंठा डोंगरात बुलढाणा हद्दीत बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी ठार 

सोयगांव ता / प्रतिनिधी मुस्ताक शहा 

सोयगाव : बुलढाणा वनक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या गिरडा बीट मधील गोंधळ खेड शिवारातील. एका शेतकऱ्यावर खाद्याच्या शोधात भटकंती करीत असलेला बिबट्याने अचानक पणे हल्ल्या केल्याने शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू शेतकऱ्यांवर हल्ले होण्याच्या घटनेत वाढ होत आहे.  घटना आज 29 ऑगस्ट रोजी तालुक्यातील गिरडा या घाटात दुपारी 2:30 ते तीन वाजेच्या सुमारास घडली आहे. सुनील सुभाष जाधव गट क्र.40 वय वर्षीय 36 असे बिबट्याने ठार केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

गोंदणखेड शिवारात गिरडा घाटात त्यांची शेती आहे. शेतीचे राखण करण्याकरिता ते शेतात गेले होते. दुपारच्या सुमारास बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या गळ्याला पकडून 40 ते 50 फूट दरीत ओढत घेऊन गेला यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळीत जाऊन शेतकऱ्याला जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उपचारासाठी हलविण्यात आले मात्र त्यांचा जागेवरच मृत्यू झाला होता . घटनेची माहिती मिळतात वन विभागाचे पथक घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे त्या खूंखार बिबट्याला वन विभागाने पकडून जेरबंद करावे अशी नागरिकांची मागणी आहे

Post a Comment

أحدث أقدم

poads

new