सोयगांव तालुक्यातील 240 पात्र दिव्यांगांना पालकमंत्री ना. अब्दुल सत्तार यांच्याहस्ते साहित्याचे वाटप करण्यात आले.

सोयगांव तालुक्यातील 240 पात्र दिव्यांगांना पालकमंत्री ना. अब्दुल सत्तार यांच्याहस्ते साहित्याचे वाटप करण्यात आले.


शहरातील पंचायत समितीच्या आवारात हा कार्यक्रम पार पडला. यूसिफ पठाण प्रतिनिधी मालेगाव नाशिक

                                                            भारत सरकारच्या सामाजिक न्याय विभागाद्वारे मागील वर्षी दिव्यांगांची तपासणी करण्यात आली होती. तपासणी मध्ये सोयगांव तालुक्यातील 240 दिव्यांग पात्र ठरले. भारत सरकार अंगीकृत अलिम्को संस्थेद्वारे 240 पात्र लाभार्थ्यांना 6 जणांना बॅटरीवर चालणारी सायकल, 68 जणांना तीन चाकी सायकल, 39 जणांना व्हीलचेअर , 80 जणांना श्रावण यंत्र, तर 47 जणांना वॉकिंग स्टिक साहित्य वाटप पालकमंत्री ना. अब्दुल सत्तार यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी  ना. अब्दुल सत्तार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.*याप्रसंगी  सोयगाव गटविकास अधिकारी दादाराव आहिरे, तालुकाप्रमुख प्रभाकरराव काळे, कृ.बाजार समितीचे उपसभापती दारासिंग चव्हाण, शहरप्रमुख संतोष बोडखे, माजी उपसभापती धरमसिंग चव्हाण, गटनेते अक्षय काळे,कदीर शहा, राजू दुतोंडे, गजानन ढगे, कुणाल राजपूत, हर्षल काळे, संदीप सुरडकर, सलीम पठाण,सुरेश चव्हाण,शेख बबलू, राधेश्याम जाधव,राजू रेकनोद,विनोद राठोड,हिरा चव्हाण,श्रीराम चौधरी, समाधान तायडे,सांडू तडवी,वसंत बनकर,रमेश गव्हांडे,दिलीप देसाई,सांडू राठोड,नारायण राठोड, श्रवण जाधव,आदींसह लाभार्थ्यांची उपस्थिती होती.

Post a Comment

أحدث أقدم

poads

new