शेतकर्यांची धडफड पिकांना पाण्याची उपलब्धेसाठी: विहिरीत आडवे बोर मारण्याची लगबग सुरू

शेतकर्यांची धडफड पिकांना पाण्याची उपलब्धेसाठी: विहिरीत आडवे बोर मारण्याची लगबग सुरू


: कदीर पटेल .m.D.  सध्या सिल्लोड तालुक्यातील उन्हाची तीव्रता वाढली असल्याने विहिरीची पाणी पातळी  कमी झाली आहे. शेतातील पिके जगविण्यासाठी शेतकरी वेगवेगळ्या प्रकारे पाण्याची उपलब्धता करण्याचा प्रर्यत्न करत आहे. विहिरीतील पाणी कमी झाल्यांने शेतकरी विहिरीमध्ये आडवेबोर मारण्याची कामे शेतकर्यांनी सुरू केले आहे. गेल्या अनेक दिवसांपासुन घाटनांद्रासह परिसरात म्हणजे धारला, चारनेर व चारनेरवाडी, आमठाणा, धावड़ा,केळगाव , अशा विविध परिसरात बोअर मारण्याचे कामे सध्या चालु आहेत. आडवे बोर मारल्यानंतर पाणी लागले तर विहिरीच्या पाण्याची पातळीत वाढ होईल तसेच हे बोअर जमिनीपासुंन जास्त खोल नसल्याने शेतात मुरलेले पाणी या बोअरच्या माध्यामातून विहिरीत येते गत वर्षीपेक्षा या वर्षी महागाई मुळे (२५ वरून ३५ रूपये प्रति पुट व खडकांच्या काठिव्य अवलंबुन असल्याची बोअर मारणारे धारला येथील शेतकरी रफिक मीया देशमुख यांनी सांगीतले तसेच विहिर खोदुन विहिरीत पाणी नसल्याने आडवे बोर मारून पाणी मिळवण्यासाठी शेतकर्यांची धडपड सुरू आहे. सिल्लोड तालुक्यातील घाटनाद्रासह परिसरात अनेक ठिकाणी पाण्याची पातळी कमी झाल्यांने गेल्या काही दिवसांपासुन ओढे,नदी,नाले,व धरणे यातील पाणी साठा आटोपला आहे.त्यामुळे विहिरीची पाणी पातळी कमी झाली यामुळे शेतकरी वर्ग सध्या पाण्याच्या शोधात विहिरीमध्ये आडवे बोर घेत आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च केला जात असुन इंजिन वरिल आडवे बोर घेण्यासाठी प्रति फुट (३०ते ३५ रूपये दरा प्रमाने आकारला जात आहे. ऐन दुष्काळात आडवे बोअराच्या दरात देखील वाढझाल्याने शेतकरी सांगत आहे. विहिरीतील खडकाचे प्रकार पाहुन हे दर आकरल्या जाते एकंदरी (२०० ते २५० फुट लांब वर मारले जात आहे. एकंदरीत जमिनीतील घटलेली पाणी पातळी आणि शेती पिकांना निर्माण झालेल्या पाण्याच्या गरजेमुळे शेतकर्यांना खिसा रिकामा करावा लागत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

poads

new