संत एकनाथ विदयालयात विद्यार्थी प्रवेशोत्सव साजरा

सिल्लोड सिल्लोड येथील नॅशनल एज्युकेशन सोसायटी संचलित संत एकनाथ विदयालयात शालेय प्रथम दिवसानिमित्त विद्यार्थी प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.तसेच यावेळी मुलांना खाऊ वाटप सुद्धा करण्यात आला. यावेळी संत एकनाथ माध्यमिक विदयालयाच्या मुख्याध्यापिका यांनी प्रेरणादायक विचारांचं संचय घेऊन विद्यार्थी जीवन संपूर्णतः दिग्दर्शक आत्मनिर्भर आणि सक्षम करण्याचे कार्य हि शाळा करत असते असे प्रतिपादन केले या कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये श्रीमती हेमलता बोरोले,श्री.दिनेश गोंगे,गणेश साळवे,आदेश सुरडकर,रमेश सपकाळ,गणेश गरुड,सचिन गव्हाणे,सचिन पालोदकर,रितेश दळवी,साळूबा सुलताने, सागर वायकुळे, विनोद तांगडे, सुवर्णा फालक,सीमा कासार, अश्विनी तायडे,सुनंदा ठाकूर,गीता जाधव,शारदा ठोंबरे,जितेंद्र साबळे,सतिष देशमुख,आदी शिक्षक -शिक्षकेत्तर कर्मचाऱ्याचा सहभाग होता.

Post a Comment

أحدث أقدم

poads

new