वंडर किड्स स्कुल मध्ये स्नेहसंमेलन उत्साहात अन्वा :अन्वा येथील वंडर किड्स स्कुल मध्ये मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री.उदय चौबे यांनी भूषविले तर प्रमुख पाहुणे म्हणुन श्री.गजानन पन्हाळे (सरपंच ),राजू बाबा काळे (व्यापारी ) मंगलसिंग जाधव (केंद्र प्रमुख )लक्ष्मण रानगोते (पोलीस ) प्रभाकर दौड यांची उपस्तीथी होती.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.उदय चौबे यांनी विदयेची देवता माता सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन केले.या नंतर मान्यवरांनी दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली.या वेळी सौंदर्या गायकवाड, श्रेयश दौड,शुभ्रा रानगोते,देवाश दौड, शोर्य दौड या चिमुकल्यांनी आमच्या पप्पाने गणपती आणला या गाण्यावर नृत्य करून धमाल उडवून दिली.तर ओ देश मेरे अयमन शेख, तनुजा फुसे,यशश्री दौड,आराध्या बोडखे, दिव्या गावंडे आदींनी सर्व पालकांची वाहवा मिळवली.या कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये सुजाता चौबे,दिक्षा गायकवाड, दिपाली जगताप यांचा सहभाग होता.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक श्री.अरुण चौबे यांनी केले तर आभार श्री.दिपक वानखेडे यांनी मानले
वंडर किड्स स्कुल मध्ये मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले.
GS9NEWS
0