संत एकनाथ विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा
सिल्लोड : सिल्लोड येथील नॅशनल एज्युकेशन सोसायटी संचलित संत एकनाथ विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला .या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संत एकनाथ माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती. हेमलता बोरोले यांनी स्वीकारले तर प्रमुख पाहुणे म्हणुन नॅशनल सूतगिरणीचे संचालक श्री.अब्दुल आमेर अब्दुल सत्तार,संत एकनाथ प्राथमिक विदयालयाचे मुख्याध्यापक श्री. दिनेश गोंगे यांची उपस्थिती होती.यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री.अब्दुल आमेर अब्दुल सत्तार यांनी रेबीन कापून या कार्यक्रमाची सुरुवात केली.या वेळी विद्यार्थीनी राणी अमृते,अक्षरा तायडे (वॉटर फिल्टर),गौरव हावळे,कार्तिक सपकाळ (हायड्रॉलीक ब्रिज), गुंजन भंगाळे, हर्षल गव्हाणे (प्रोजेक्टर )आजिनाथ राठोड (हायड्रॉलीक मशीन)तनुजा दौड,वेदिका भिवसने( ज्वालामुखी) सावली पदमिरे, आराध्या पाटील (हवा प्रदूषण ) नंदिनी पोफळे, ज्ञानंदा पोफळे(नॅचरल हिटर )आदींनी प्रयोग सादर केले.या कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये सागर वायकुळे,गणेश साळवे,आदेश सुरडकर,रमेश सपकाळ,गणेश गरुड,सचिन गव्हाणे,सचिन पालोदकर,रितेश दळवी,साळूबा सुलताने,विनोद तांगडे, सुवर्णा फालक,सीमा कासार,
अश्विनी तायडे,सुनंदा ठाकूर, भारती नाईक, गीता जाधव,शारदा ठोंबरे,जितेंद्र साबळे,सतिष देशमुख,आदी शिक्षक -शिक्षकेत्तर कर्मचाऱ्याचा सहभाग होता.