संत एकनाथ विद्यालयात बालिका दिन साजरा सिल्लोड वार्ताहार सुशील कुमारR5

संत एकना थ विद्यालयात बालिका दिन साजरा सिल्लोड वार्ताहार सुशील कुमारR




सिल्लोड : सिल्लोड येथील अग्रमानांकित संत एकनाथ विद्यालयात बालिका दिनानिमित्त क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संत एकनाथ माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती. हेमलता बोरोले यांनी स्वीकारले. तर प्रमुख पाहुणे म्हणुन पोलीस निरीक्षक शेषराव उदार,भूषण चौधरी(पी.सी.) श्रीमती डी.डी.चिकटे(दामिनी पथक),श्रीमती आय. एस.मुंडे(दामिनी पथक), संत एकनाथ प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. दिनेश गोंगे यांची उपस्थिती होती.यावेळी पोलीस निरीक्षक श्री. शेषराव उदार यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात केली.या वेळी विद्यार्थीनी वैष्णवी चिंचपुरे, वेदिका सुलताने,सर्वेशा जंजाळ, नम्रता जाधव, विद्या सपकाळ तेजल गायकवाड आदींनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरती नाटिका सादर केली तर कल्याणी साबळे, साक्षी साळवे, स्वराली परदेशी यांनी  क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा सादर करून सर्वांची मने जिंकली.या वेळी प्रमुख पाहुण्या श्रीमती. आय. एस.मुंडे मॅडम  (दामिनी पथक)यांनी स्त्रीयांच्या आजच्या काळातील समस्या, गुड टच - बेड टच विषयी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शक केले. या वेळी विद्यार्थ्यांना शस्त्राविषयी माहिती देण्यात आली या कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये गणेश साळवे, गणेश गरुड,साळूबा सुलताने, सचिन गव्हाणे, रितेश दळवी, सागर वायकुळे,रमेश सपकाळ, विनोद तांगडे, सचिन पालोदकर,सुवर्णा फालक,सीमा कासार, अश्विनी तायडे,सुनंदा ठाकूर, भारती नाईक, गीता जाधव,जितेंद्र साबळे,सतिष देशमुख,आदी शिक्षक -शिक्षकेत्तर कर्मचाऱ्याचा सहभाग होता.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. वैष्णवी घोडके व सानिका गाढवे यांनी केले तर आभार सहशिक्षक 

श्री. गणेश गरुड यांनी मानले.

Post a Comment

أحدث أقدم

poads

new