संत एकनाथ विद्यालयात जिजाऊ जन्मोत्सव व युवादिन साजरा सिल्लोड सिल्लोड येथील अग्रमानांकित संत एकनाथ विद्यालयात

संत एकनाथ विद्यालयात जिजाऊ जन्मोत्सव व युवादिन साजरा सिल्लोड  



सिल्लोड येथील अग्रमानांकित संत एकनाथ विद्यालयात स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ व प्रकांड पंडित स्वामी विवेकानंद यांना त्यांच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संत एकनाथ प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. दिनेश गोंगे यांनी स्वीकारले तर प्रमुख पाहुणे म्हणुन सहशिक्षक श्री. रितेश दळवी व श्रीमती. सुवर्णा फालक यांची उपस्थिती होती.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. दिनेश गोंगे यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात केली.या वेळी विद्यार्थीनी रुपाली बन्सोड, कल्याणी ठाले, ज्योती लोखंडे, भक्ती भवर, प्रणव काकडे आदींनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची महती भाषणाद्वारे स्पष्ट केली तर विद्यार्थिनी तेजल गायकवाड, आरुषी मेटे, सर्वेषा जंजाळ यांनी जिजाई घे मानाचा मुजरा या गाण्यावर नृत्य करून उपस्तित पालकांची वाहवा मिळवली या कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये मुख्याध्यापिका हेमलता बोरोले,गणेश साळवे,गणेश गरुड,साळूबा सुलताने,सचिन गव्हाणे, सागर वायकुळे,रमेश सपकाळ, विनोद तांगडे, सचिन पालोदकर,सीमा कासार,अश्विनी तायडे,सुनंदा ठाकूर, भारती नाईक, गीता जाधव,जितेंद्र साबळे,सतिष देशमुख,आदी शिक्षक -शिक्षकेत्तर कर्मचाऱ्याचा सहभाग होता.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.हर्षदा सरोदे व स्नेहल पंडित यांनी केले तर आभार सहशिक्षक श्री. गणेश साळवे यांनी मानले.

Post a Comment

أحدث أقدم

poads

new