छत्रपती राजे संभाजी इंग्लिश मीडियम स्कूल दुसाने येथे आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले जयंती साजरी.

 छत्रपती राजे संभाजी इंग्लिश मीडियम स्कूल दुसाने येथे आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले जयंती साजरी.





मालपुर प्रतिनिधी श्री प्रभाकर आडगाळे.साक्री तालुक्यातील दुसाने येथील छत्रपती राजे संभाजी इंग्लिश मीडियम स्कूल येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी.या कार्यक्रमाचे मुख्य अध्यक्ष माजी उपसरपंच श्यामजी महाले, हे अध्यक्ष स्थान होते, विजयराव दादासो विजयराव वसंतराव खैरनार, प्राचार्य राजेंद्र पाटील, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष. श्री संजय राव वसंतराव खैरनार, व सौ नितिषा खैरनार,, विद्यार्थी पालक सौ विजयाताई पाटील, शिक्षिका सौ भारती कंडारे, सो कविता बिरारी, सौ जागृती पाटील, पत्रकार श्री प्रभाकर आडगाळे. आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांचे भाषणे झालेत सर्वोत्कृष्ट स्पीच म्हणून कुमारी जानवी पाटील हिने विद्यार्थ्यांना वाचून दाखवला, व विशेष माहिती दिली, अध्यक्षांची भाषणे झालेत. सौ भारती कंडारे यांनी सावित्रीबाई फुले यांचा जीवन वृत्तांत विद्यार्थ्यांना पटवून सांगितला. त्यांनी आठव्या शतकातील स्त्रिया आणि आजच्या स्त्रिया यांच्यात किती फरक आहे हा देखील आपल्या भाषण शैलीत स्पष्ट केली. त्या म्हणाल्या की अठराव्या शतकातील महिलांना चूल आणि मूल एवढेच माहिती होते परंतु सावित्रीबाई फुले यांनी विविध वेतना सहन करून आपल्या महिलांसाठी सक्षम शाळा सुरू केल्यात, त्यांचे आद्य गुरु म्हणजे त्यांचे पती महात्मा ज्योतिराव फुले, यांनी पुणे येथे पहिली महिला शाळा ओपन केली, त्यात प्रामुख्याने आपल्या स्वतःच्या पत्नीला सुशिक्षित करून एक आदर्श शिक्षिका म्हणून ज्ञान दिले अशा या थोर विनम्र अभिवादन करून आपला भाषणाचा समारोप केला. सूत्रसंचालन राजेंद्र पाटील यांनी केले, आभार प्रदर्शन श्री प्रभाकर आडगळे सर यांनी केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

poads

new