शिरपूर शहर पो.स्टे. ची कामगिरी (५ वर्षांपासुन चोरीचे गुन्ह्यातील तसेच ३

शिरपूर शहर पो.स्टे. ची कामगिरी (५ वर्षांपासुन चोरीचे गुन्ह्यातील तसेच ३ वर्षांपासुन बनावट चलनी नोटांचे गुन्ह्यातील फरार असलेले २ आरोपीतांना शिताफीने केले जेरबंद )
शिरपूर शहर पो.स्टे.चे पोलीस निरीक्षक श्री.ए.एस.आगरकर यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, शिरपूर शहर पो.स्टे. गुरनं. ७९/२०१८ भादंवि कलम ३७९, ३४ प्रमाणे चोरीचे गुन्ह्यातील सुमारे ५ वर्षांपासुन फरार असलेला आरोपी नामे आनंदसिंग ऊर्फ पिंटु प्रताप ठाकरे (भिल) वय ३५ रा. खामखेडा ता. शिरपूर जि. धुळे हा खामखेडा गावात आलेला असल्याबाबत मिळालेल्या बातमीवरून शिरपूर शहर पो.स्टे. चे पोलीस अधिकारी व शोध पथकाचे पोलीस अंमलदार यांनी दि. २२/१२/२०२३ रोजी खामखेडा गावात जावुन सदर आरोपीताचा शोध घेवुन त्यास शिताफीने ताब्यात घेवुन सदर गुन्ह्यात अटक केली.तसेच आज दि. २३/१२/२०२३ रोजी शिरपूर शहर पो.स्टे. चे पोलीस निरीक्षक श्री.ए.एस.आगरकर यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, शिरपूर शहर पो.स्टे. गुरनं. २३४/२०२० भादंवि कलम ४८९ (अ), ४८९ (क), ४८९ प्रमाणे बनावट चलनी नोटाचे गुन्ह्यातील सुमारे ३ वर्षांपासुन फरार असलेला आरोपी नामे मंगल पंजाब बेलदार वय २७ रा. कळमसरे ता. शिरपूर जि.धुळे हा कळमसरे गावात आलेला असल्याबाबत मिळालेल्या बातमीवरून शिरपूर शहर पो.स्टे. चे शोध पथकाचे पोलीस अंमलदार यांनी दि. २३/१२/२०२३ रोजी कळमसरे गावात जावुन सदर आरोपीताचा शोध घेवुन त्यास शिताफीने ताब्यात घेवुन सदर गुन्ह्यात अटक केली वरील प्रमाणे ५ वर्षापासुन चोरीचे गुन्ह्यातील तसेच ३ वर्षांपासुन बनावट चलनी नोटांचे गुन्ह्यातील फरार असलेले २ आरोपीतांना शिरपूर शहर पो.स्टे. चे पोलीस अधिकारी व शोध पथकाचे अंमलदार यांनी शिताफीने ताब्यात घेवुन उल्लेखनीय कामगिरी केली आहे.सदरची कामगिरी मा. पोलीस अधिक्षक श्री. श्रीकांत धिवरे, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. किशोर काळे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सचिन हिरे यांचे मार्गदर्शनाखाली शिरपूर शहर पो.स्टे. चे पोलीस निरीक्षक श्री.ए.एस. आगरकर, पोलीस उपनिरीक्षक हेमंत खैरणार, गणेश कुटे, संदिप मुरकुटे, संदिप दरवडे व सुरेश सोनवणे तसेच डी.बी. पथकाचे पोहेकॉ/ललीत पाटील, कैलास वाघ पोना/रविंद्र आखडमल, पोकों/योगेश दाभाडे, गोविंद कोळी, विनोद आखडमल, भटु साळुंके, सचिन वाघ, मनोज दाभाडे, मनोज महाजन, प्रशांत पवार, आरीफ तडवी तसेच चापोकों/विजय पाटील व होमगार्ड मिथुन पवार अशांनी मिळून केली आहे

Post a Comment

أحدث أقدم

poads

new