सिल्लोड एक्सप्रेस

दि.20 - धुळे/कलमाडी   #विजयी वर्षपूर्ती 1वर्ष पुर्ण*कलमाडी वासियांनी प्रचंड विश्वासाने माझ्या अंगावर विजयाचा गुलाल टाकला,या घटनेला आज बरोबर एक वर्ष पूर्ण होतंय. तसं पाहिलं तर संरपच म्हणून काम करताना एक वर्षाचा कालावधी हा खूप छोटा असतो,पण तरीही गेल्या वर्षभरात गावाचा विकासासाठी मी काय केलं याची गोळाबेरीज इथल्या जनतेसमोर मांडणं माझं कर्तव्य समजतो.*जनेतेने टाकलेल्या विश्वासाला वर्षपूर्ती निमित्त कामाचा लेखा जोखा *1* -गावाच्या शेतकऱ्यांचा मुख्य मागणी असलेला वालखेडा वाट ही निवडणुनंतर तात्काळ पाणंद रस्त्याच्या माध्यमातून दर्जेदार रस्ता हा बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे,*2* -सोनवद धरणाच्या पाटचारीतून  पाणी हे गावच्या पांढरीच्या शेत तळ्यात टाकून आजूबाजूच्या शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला .*3* गावातील बंद पडलेले सगळे महिला शौचालय हे नव्याने दुरुस्त केले आहेत *4* - प्रकाश ओंकार पाटील ते सुधाकर पुंजू पाटील ह्यांच्या गल्लीत पेव्हर ब्लॉक बसवले आहेत *5* - कलमाडी फाटा ते कंपनी कडे नवीन एलडी स्ट्रीट लाईट बसवले.. *6* - सुरेश खंडेराव पाटील ते पंकज सिसोदे ह्यांच्या गल्लीत पेव्हर ब्लॉक बसवले *7* - श्री नामदेव भदाने व श्री प्रीतिराज दादा ह्यांच्या घराकडे पिण्याचे पाणी मिळावे म्हणून नवीन 3 इंच 800 मीटर पाईप लाईन टाकून पाण्याची व्यवस्था केली.*8* - गावात ठिकठिकाणी नवीन स्ट्रीट लाईट बसवले आहेत त्यात माळीच रस्ता,एमआयडीसी रस्ता,मोहन राजधर पाटील ह्याचे घराकडे,गावाच्या दर्शनीय भागावर लाईट बसवले आहेत
 *9* - गावात अनेक ठिकाणी नवीन गटार टाकून सांडपाणी व्यवस्थापन केले आहे *10* - गावात सर्वत्र रोषणाई मिळावी म्हणून लाईट टाकले आहेत...
वरील कामे ही 1 वर्षात केली आहेत, गावात ज्या ज्या माय बाप लोकांनी लाईट,सांडपाणी गटार,पिण्याचे पाणी,स्वच्छ्ता बाबत काम सांगितले ते तात्काळ आम्ही केली आहेत त्या सोबत शासकीय लाभ,आरोग्य सुविधा 24 तास देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही केला आहे, कळत नकळत काही चुका झाल्या असतील तर नतमस्तक होऊन माफी मागतो, व उर्वरित काळात सगळी कामे पूर्ण करण्याचं आश्वासन देतो.कलमाडी गावाच्या विकासासाठी सहकार्य करावं,माझं आवाहन आहे. कारण इथं कुण्या 'एका व्यक्तीचा' विकास करण्याचं काम सुरू नाही तर संपूर्ण गावाच्या विकास करण्याचं काम सुरुय

Post a Comment

أحدث أقدم

poads

new