दि. १८ डिसेंबर २०२३ नगांव - रोजी माजी आमदार कै. आण्णासाहेब द. वा. पाटील यांच्या जयंती निमीत्त सहवेदना आठवणींना उजाळा तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन धुळे ता. १८ - शिंदखेडा व धुळे ग्रामीण विधानसभा मतदार संघाचे भाग्य विधाते माजी आमदार कै आण्णासाहेब द. वा. पाटील याची आज दि.१८ डिसेंबर रोजी ८६ व्या जयंतीचे आयोजन नगांव येथील गंगामाई शैक्षणिक संकुल मधील शक्ती स्थळावर करण्यात आले होते.या वेळी माजी आमदार कै.आाण्णासाहेब द. वा.पाटील यांच्या सहवेदना आठवणींना उजाळा उपस्थित सर्व तालुक्यातील समर्थक व बाळासाहेब मनोहर भदाणे , जि. प. सदस्य राम भदाणे यांनी दिला. या प्रसंगी माजी सभापती तथा लोकनियुक्त सरपंच सौ. ज्ञानज्योतीमाई भदाणे तसेच धुळे तालुक्यातील आण्णासाहेबांवर प्रेम करणारे हितचिंतक यांच्या सह नगांव एज्युकेशन सोसायटी व गंगामाई एज्युकेशन ट्रस्ट संचलित सर्व शाखांचे सर्व प्राचार्य , मुख्यध्यापक शिक्षक कर्मचारी बंधू-भगिणी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी भाजपाचे नेते तथा नगांव एज्युकेश सोसायटी व गंगामाई एज्युकेशन ट्रस्टचे सर्वेसर्वा श्री.बाळासाहेब मनोहर भदाणे यांनी अभिवादन पर भाषण करतांना म्हणाले की आपण आज जे वटवृक्षाच्या सावलीत उभे आहोत. ते मा. आण्णासाहेबांनी लावलेले रोपटे होते त्याचे आज वटवृक्षात रुपांतर झाले आहे. हे केवळ समाधी स्थळ नसून शक्तीस्थळ आहे.आण्णासाहेबांच्या कुशल नेतृत्व कतृत्व व दातृत्वामुळे आज हे सर्व आपल्याला बघायला अनुभवयाला मिळत आहे. त्यांच्या पावन शक्ती स्थळावर आपण खऱ्या श्रद्धेने इच्छा व्यक्त केली तर ती नक्कीच पुर्ण होते हा माझा विश्वास आहे.आण्णासाहेबांनी केलेलेे कार्य तालुक्यासह संपुर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. संपुर्ण आयुष्य संघर्ष करुन त्यांनी ऐवढे मोठे वटवृक्ष उभे केले आहे. ज्या वेळेस ग्रामीण भागातील तरुणांना शिक्षणासाठी मुंबई, पुणे जाणे अतिशय जिकरीचे होते त्या काळी नगांव सारख्या ग्रामीण भागात केजीटु पीजी पर्यंत शिक्षणाची सोय उपलब्ध करुन दिली. त्यामुळे आज शिक्षण नाही तर नोकरी घेऊनच विद्यार्थी या संस्थेमधून बाहेर पडत आहे.हे सर्व मा.आण्णासाहेब द.वा.पाटील यांच्या कृपेनेच असे यावेळी बाळासाहेब मनोहर भदाणे यांनी उपस्थितीतां समोर अभिवादन पर भाषण करतांना म्हणालेत.तसेच नगांव एज्युकेशन सोसायटी चेअरमन तथा जि.प.सदस्य राम भदाणे यांनी देखिल मा.आण्णासाहेब द.वा.पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला. ते यावेळी बोलतांना म्हणाले आण्णासाहेबांनी केलेले कार्य आपल्या सर्वांना पुढे घेऊन जायचे आहे.त्यांचे नाव होईल असेच आपल्या तालुक्यात काम करावयाचे आहे. आण्णासाहेब आपल्या सर्वांना खुप मोठा आशिर्वाद देऊन गेले आहेत.म्हणून आपण फक्त त्यांचे पाईक म्हणून त्यांचा वारसा पुढे नेण्याचे काम करावयाचे आहे आण्णासाहेब नेहमी राजकारना पेक्षा समाजकारणावर अधिकची भर देत असत त्यांच्याच पाऊलावर पाऊल ठेवून आपण संपूर्ण धुळे तालुक्यात आण्णासाहेब द.वा.पाटील प्रतिष्ठाणच्या माध्यमातून दरवर्षी शेतकऱ्यांसाठी पशुवैद्यकीय शिबीर बेरोजगारांसाठी रोजगार मेळावे वयोवृद्धांसाठी मोफत नेत्रतपासणी शिबीर व शस्त्रक्रिया शिबिरांचे आयोजन गोर-गरीबांसाठी मोफत पाच लाख पर्यंत्याचा उपचाराचे आयुष्यमान भारत कार्ड चे मोफत रजिस्ट्रेशन व कार्ड वाटप असंघटीत कामगारांसाठी ई-श्रम कार्ड १८ वर्ष पूर्ण झालेल्यांसाठी मतदार नोंदणी असे विविध उपक्रम आपण प्रामाणिकपणे राबवित शेवटच्या घटकां पर्यंत पोहचविण्याचे काम आपण करत आहोत हिच आण्णासाहेबांना खरी श्रद्धांजली ठरेल असे यावेळी बोलतांना म्हणालेत.पुढे बोलतांना राम भदाणे म्हणालेत आण्णासाहेब शेतकरी कुटुंबातून पुढे आलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनीत्यांच्या काळात फार मोठा संघर्ष केला त्यांच्या संघर्षाला सर्व तालुक्यातील जनता व सर्व शिक्षक वर्ग ज्ञात आहेत. एका ग्रामीण भागातून सरपंच पदापासून ते आमदार की पर्यंतचा काळ खडतर राहिला आहे.तो काळ मला बघायला नाही मिळाला.परंतू त्याची जाणीव मला आहे. त्यांनी केलेले कार्यमला त्यांच्या नावानेच पुढे न्यायचे आहे यात शंका नाही.त्यांनी तालुक्यातील जनतेसह कुटुंबाला जे काही देऊन गेले आहेत. त्याचा अभिमान सर्वांना आहे.अण्णासाहेबांचा वारसा आणि वारसापुढे नेण्याचे काम आपल्या सर्वांनाच करायचे आहे.असे यावेळी राम भदाणे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना म्हटले.कै.आण्णासाहेब द.वा.पाटील यांच्या जयंती निमीत्त धुळे तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यातआले होते.यांत आयुष्यमान भारत कार्डचे मोफत रजिस्ट्रेशन व कार्ड वाटप तसेच विश्वकर्मा योजनांचे रजिस्ट्रेशन देखिल मोफत करण्यात आले. संपूर्ण तालुक्यात मोफत ५ लाखापर्यंतच्या उपचाराचे आयुष्यमान कार्ड चे मोफत वाटप करण्यात येणार आहे अशी माहिती यावेळी जि. प. सदस्य राम भदाणे यांनी दिली. जि. प. सदस्य राम भदाणे सिल्लोड एक्सप्रेस धुळे जिल्हा प्रतिनीधी दुयौधन पाटील
सिल्लोड एक्सप्रेस
GS9NEWS
0