कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या आंबे दिंडोरी या गावी जाऊन ना.डॉ.भारती पवार यांनी केले विनम्र अभिवादननाशिक विभागीय प्रतिनिधी सुनील घुमरे

कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या आंबे दिंडोरी या गावी जाऊन ना.डॉ.भारती पवार यांनी केले विनम्र अभिवादन
नाशिक विभागीय प्रतिनिधी सुनील घुमरे
आंबेडकर चळवळीतील अग्रगण्य नेते स्वर्गीय कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या जयंतीनिमित्त केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री ना. डॉ. भारती पवार यांनी त्यांचे जन्मगाव असलेले आंबे दिंडोरी ह्या गावी जाऊन त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन केले . ह्या प्रसंगी ना. भारती पवार यांनी त्यांचे असलेले काम तसेच स्वर्गीय  आ. ए .टी. पवार यांचे दादासाहेबांशी असलेले  निकटचे नाते याची आठवण देत त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला .1967 साली त्यावेळी जनसंघ आणि आर. पी. आय . ची युती असतांना दादासाहेबांनी लोकसभेची नाशिक मधून निवडणूक लढवली होती. तसेच अटलजी पंतप्रधान असतांना स्वर्गीय प्रमोदजी महाजन यांनी दादासाहेबांवर पोस्टाने काढलेल्या तिकिटाचे प्रकाशन केले होते . भारतीय जनता पक्षाच्या पुढाकाराने नाशिक महानगरपालिकेने दादासाहेबांच्या स्मृती जपण्यासाठी नेहरू गार्डन येथे पुतळा देखील उभारला तसेच महाराष्ट्राचे तत्कालीन  मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस ह्यांनी रमाबाई  आंबेडकर वसतिगृहाच्या  नूतनिकरणासाठी मोठा निधी उपलब्ध करून देऊन त्याचे नूतनीकरण केले ."दादासाहेब एक आंबेडकर चळवळीतील महान नेतृत्व होते .त्यांचे नाव कार्य असामान्य होते . असे प्रतिपादन  ना. डॉ. भारती पवार यांनी केले . ह्याप्रसंगी ह्या कार्यक्रमाचे औचित्य साधत आंबे दिंडोरी गावातील व्यायामशाळा ,सौर मोटार पंप, बाणगंगा नदी लगत संरक्षण भिंत,स्मशानभूमीत फेवरब्लॉक बसवणे या सारख्या विविध विकासकामांचे उदघाटन  ना. डॉ. भारती पवारांच्या हस्ते करण्यात आले .ह्या कार्यक्रमाप्रसंगी दिंडोरी भाजपा तालुकाध्यक्ष नरेंद्र जाधव, बापू पाटील , सुरेश डोखळे ,बेबीताई सोळसे,तुकाराम जोंधळे ,रुपाली वाघ ,योगेश तिडके अमोल खाडे, नितीन गायकर,मंगेश कराटे, सागर गायकवाड, मोतीराम पिंगळे, संगीता खर्डे, गोकुळ बामणे, रत्ना फसळे, बाबूसेठ बागमार, पंढरीनाथ पिंगळे, हिराबाई भिसे, राजेंद्र  गायकवाड, सुभाष वाघ, बाबूराव गायकवाड, अनिल परदेशी, शामराव वाघ, रवींद्र पवार सर यांचेसह आंबे दिंडोरी तील ग्रामस्थ उपस्थित होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

poads

new