शिंदखेड्यात विद्यार्थ्यांसाठी सकाळ व दुपार सत्राच्या बसेस वेळेवर सुरु करण्याची शिवसेना-युवासेनेची मागणी शिंदखेडा (प्रतिनिधी) तालुक्यातील विद्यार्थ्यांना सकाळी व दुपारी वेळेवर महाविद्यालयात पोहोचण्यासाठी शिंदखेडा एसटी बस आगारतर्फे सकाळ व दुपार सत्राच्या बसेस वेळेवर सुरु करावी,अशी मागणी शिवसेना-युवासेनेतर्फे शिंदखेडा आगारप्रमुख यांना आज सकाळी 11.00 वाजता निवेदनाद्वारे करण्यात आली.
दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे की, कोविड-19 मुळे शाळा-महाविद्यालय गेल्या दोन वर्षापासून बंद होती. दोन वर्षानंतर कोविड-19 चा प्रादुर्भाव राज्यात कमी झालेला आहे. राज्य शासनाच्या परिपत्रकानुसार राज्यासह तालुक्यातील शाळा व महाविद्यालय दि.20 ऑक्टोंबर 2021 पासुन नियमितपणे सुरु करण्याचे आदेश दिले आहेत.त्यानुसार शाळा व महाविद्यालये सुरु झाली. मात्र ग्रामीण भागातील लालपरी अर्थात एसटी बसच्या वेळापत्रकात गेल्या दोन वर्षापासून बदल झालेला होता. शाळा व महाविद्यालये सुरु झाली मात्र विद्यार्थ्यांना वेळेवर पोहण्यासाठी एसटी बस वेळेवर उपलब्ध झाली नाही. गेल्या दोन दिवसापासून विद्यार्थी खाजगी वाहनाने शाळा-महाविद्यालयात पोहचत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी सकाळ व दुपार सत्राच्या बसेस वेळेवर सुरु करावी, असेही निवेदनात शेवटी नमुद केले आहे.याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख गिरीश देसले,विधानसभा क्षेत्रप्रमुख गणेश परदेशी,शहरप्रमुख संतोष देसले,वाहतुक सेनेचे नाना पहाडी, विभागीय प्रमुख दिनेश परदेशी,किशोर माळी, युवासेनेचे मानव सूर्यवंशी, भरत माळी आदींसह महाविद्यालयांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.