सर्व मतदार यांनी आपले दुबार ठिकाणी नावे ठेवू नये यासाठी बी एल ओ नी काळजी पूर्वक काम करावे निवडणूक नायब तहसीलदार आबासाहेब तांबे. दिडोरी यांचे आव्हान.

सर्व मतदार यांनी आपले  दुबार ठिकाणी नावे ठेवू नये  यासाठी बी एल ओ नी काळजी पूर्वक काम करावे    निवडणूक नायब तहसीलदार आबासाहेब तांबे. दिडोरी   यांचे आव्हान.
सुनिल घुमरे नाशिक विभागीय प्रतिनिधी
नाशिक जिल्हा प्रशासनाकडे मतदारांची दुबार नावे असल्याबाबत लेखी तक्रार अर्ज प्राप्त झालेले आहेत. सदर तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हा स्तरावर सदर नावे दुबार आहेत किंवा कसे ? याबाबत पडताळणीचे कामकाज जिल्ह्यातील आपल्या दिंडोरी मतदारसंघात मतदार नोंदणी अधिकारी यांच्या स्तरावर सुरू आहे.उपरोक्त याद्यांमधील नावांची पडताळणी नागरिक, राजकीय पक्ष यांचे माहितीसाठी ज्या स्वरुपात प्राप्त झालेल्या आहेत तशा प्राप्त झालेल्या दुबार मतदारांच्या याद्या याद्वारे प्रसिद्ध करण्यात येत आहेत. सदर नावे दुबार आहेत किंवा कसे ? याबाबत स्वतःच्या नावांची अथवा अन्य नागरीक, स्वयंसेवी संस्था यांना खात्री करता यावी या दृष्टीने उपरोक्त दुबार मतदारांच्या याद्या www.nashikmitra.in या संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहेत. या याद्यांची यथोचित पडताळणी झाल्यानंतर विहीत कार्यपध्दतीचा अवलंब करुन नावे वगळणीबाबत कार्यवाही मतदार नोंदणी अधिकारी यांचे स्तरावरून करण्यात येणार आहे.मतदार यादीत दुबार नाव नोंदविणे किंवा नाव नोंदणी करतांना चुकीचे माहिती सादर करणे हे लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1950 चे कलम 31 अन्वये शिक्षेस पात्र आहे. ही बाब सर्व संबंधितांच्या निदर्शनास आणून देण्यात येत आहे.सर्व मतदार, नागरिक, राजकीय पक्ष यांनी उपरोक्त यादीतील नावांची पडताळणी करून जर मतदाराचे नाव दुबार नोंदवले गेले असल्यास ज्या ठिकाणी संबंधित मतदाराचा सर्वसाधारण रहिवास आहे त्या ठिकाणीच मतदार यादीचे नाव कायम ठेवून दुसऱ्या ठिकाणचे नाव तातडीने वगळण्यात यावे. मतदार त्यांच्या नावाची खात्रो हि www.nvsp.in या संकेतस्थळावर जाऊन सुद्धा करू शकतात. तसेच मतदारांना मतदान नोंदणी बाबत काही माहिती हवी असल्यास ते कार्यालयीन वेळेत टोलफ्री क्रमांक 1950 या तसेच संबंधित मतदान नोंदणी कार्यालय यांचे कार्यालयात संपर्क साधू शकतात.
सर्व नागरीक, स्वयंसेवी संस्था, मिडीया, लोकप्रतिनिधी व प्रशासन मिळून आपण मतदार याद्या अद्यावत व अचूक राखण्याचे कर्तव्य पार पाडले(सूरज दि. मांढरे)
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, नाशिक तह दिलदार दिंदोरी याचे मार्गदर्श नाणे
जानोरी येथे निवडणुक नायब तहसिलदार श्री. आबासाहेब तांबे दिंडोरी सो यांचे अध्यक्षतेखाली जानोरी, जऊलके दिंडोरी,आंबे दिंडोरी,शिवनई,वरवंडी,येथील मतदान केंद्र स्तरीय अधिकारी(बिएलओ) यांची  दुबार  नावे असलेल्या मतदारांबाबत  माहिती घेऊन  मा. मतदार नोंदणी अधिकारी यांच्या सूचनेनुसार आढावा बैठक घेऊन मार्गदर्शन केले समवेत तलाठी विजय कातकडे(आंबे दिंडोरी)तलाठी जानोरी किरण भोये उपस्थित मनिषा पाटील सर्व बी .एल ओ होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

poads

new