कादवाचा बॉयलर अग्निप्रदिपण
सुनील घुमरे नाशिक विभागीय प्रतिनिधी
दिंडोरी : कादवाची 1250 मेंटन गाळप क्षमता दुप्पट झाली ऊस उत्पादकांना उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक भाव मिळत आहे.नव्याने इथेनॉल प्रकल्प साकारत असून कादवाने राज्यात नावलौकिक मिळवला असून कादवाचे प्रगतीस सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन विधानसभेचे प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी केले.
कादवा सहकारी साखर कारखान्याचे 45 वे बॉयलर अग्निप्रदीपन विधानसभा प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचे हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे होते.बॉयलर अग्निप्रदीपन पूजन सौ व श्री.बाळासाहेब विठ्ठल देशमुख, सौ व श्री.मधुकर टोपे सर यांचे हस्ते झाले.पुढे बोलताना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी विकासकामांसाठी सरकारला कर्ज घ्यावे लागते तेव्हा कादवा ही छोटी संस्था आहे तिला विस्तारीकरण नवीन इथेनॉल आदी प्रकल्पासाठी कर्ज घ्यावेच लागणार आहे व त्यात गैर काही नाही त्याच उगाच काही बाऊ करू नये सर्वांनी संस्थेच्या प्रगतीला सहकार्य करावे.दोन वर्षे कोव्हिडं मुळे निधी न मिळाल्याने तालुक्यात रस्त्यांचा प्रश्न गंभीर बनला असून सर्व रस्त्यांची कामे पाऊस थांबताच सुरू केले जातील असे सांगत विज व पाणी प्रश्न सोडविला जाईल असे सांगतानाच वीज बील माफीबाबत वीज प्रश्नबाबत मी राज्य शासनाकडे शेतकऱ्यांची बाजू मांडेल पण वीज पुरवठा कायम सुरू राहण्यासाठी शेतकऱ्यांनी चालू बिल का होईना भरत सहकार्य करावे असे आवाहन केले. परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे झिरवाळ यांनी सांगितले.यावेळी बोलताना कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी कारखान्याची सध्य स्थितीची सविस्तर माहिती देत साखरेला अपेक्षित भाव व उचल होत नसल्याने साखर उद्योग अडचणीत असतानाही कादवा ने एफआरपी अदा केली आहे इथेनॉल प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर असून त्यासाठी प्रत्येक सभासदाने 5 हजार का होईना ठेव ठेवावी त्यास कारखाना 10 टक्के व्याज देईल.एक वेळ कादवा ला कुणी ऊस देत नव्हते आता जिल्ह्यातील ऊस उत्पादक कादवा ला प्रथम पसंती देत आहे संस्थेचा हितासाठी नाविलाजास्तव बाहेरून ऊस आणावा लागला.यावर्षी ऊसतोडणी करताना कार्यक्षेत्राला प्राधान्य दिले जाईल असे सांगितले.विरोधक राजकीय स्वार्थासाठी विस्तारीकरण ला विरोध करत होते आता इथेनॉल ला विरोध करत आहे पण अतिरिक्त साखरेचा प्रश्न निर्माण झाला असून केवळ साखर निर्मितीवर कारखाने चालू शकत नाही त्यामुळे केंद्र सरकारने इथेनॉल ला प्रोत्साहन दिले असून कादवाचा इथेनॉल प्रकल्प या हंगामात कार्यान्वित होत असून त्याचा निश्चित शेतकऱ्यांना लाभ होणार आहे सीएनजी प्रकल्पसाठीही सरकारने 50 टक्के सबसिडी देऊ केली असून संपूर्ण अभ्यासाअंती हा प्रकल्प हाती घेतला जाणार असून ऊस हे शाश्वत पीक असून सर्व शेतकरी सभासदांनी जास्तीत जास्त ऊस लागवड करावी असे आवाहन श्रीराम शेटे यांनी केले. यावेळी जिल्हा बँक संचालक गणपतराव पाटील,बाजार समिती सभापती दत्तात्रेय पाटील,माजी संचालक संजय पडोळ,विश्वासराव देशमुख,विठ्ठलराव संधान ,युनियन अध्यक्ष दत्तात्रेय वाकचौरे यांनी विचार मांडले. यावेळी तहसीलदार पंकज पवार, सहा.गटविकास अधिकारी शेवाळे, दिंडोरीचे माजी सभापती सदाशिव शेळके, चांदवडचे माजी सभापती अमोल भालेराव,माजी संचालक शिवाजीराव जाधव,अशोक वाघ,अशोक भालेराव,सुरेश मामा कळमकर,रामभाऊ ढगे,बोपेगाव चे सरपंच वसंतराव कावळे,संजय कावळे,अनिल देशमुख, भास्कर भगरे, नरेश देशमुख,गुलाब जाधव,एकनाथ बर्डे,रंगनाथ बर्डे,सुरेश कोंड,दामोदर शेळके,राजाराम सोनवणे,दत्तू गटकळ,वामनराव कावळे,प्रकाश पिंगळ,विठोबा पिंगळ,श्रीराम उगले,हिरामण वरपे,पंढरीनाथ पाटील,विजय वाघ,प्रमोद मूळाने, राजेश खांदवे, मधुकर बोरस्ते,शिवाजी पताडे, शाम हिरे, गंगाधर निखाडे, डॉ.योगेश गोसावी,रघुनाथ पाटील,शिवाजी जाधव,नवनाथ ठोंबरे,बाळासाहेब शिंदे,एस के पाटील,गोरक्षनाथ शिंदे,छबु मटाले,बबन जाधव,स्वप्नील पवार,शांताराम बाऱ्हाते, विजय डोखळे,सुनील पाटील,विश्राम दुगजे,रघुनाथ जाधव,सुरेश बोरस्ते,हिरामण जानोरी,नारायण पालखेडे, भाऊसाहेब गणोरे आदींसह कारखान्याचे सर्व संचालक, अधिकारी ,कामगार,सभासद उपस्थित होते.प्रास्ताविक संचालक शहाजी सोमवंशी यांनी केले कार्यकारी संचालक हेंमत माने यांनी आभार मानले.इथेनॉल प्रकल्पाची पाहणी
बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ नंतर उपस्थितांनी इथेनॉल चे सुरू असलेल्या कामकाजाची पाहणी करत माहिती घेतली.कार्यकारी संचालक हेमंत माने,डिस्टीलरी प्रमुख सुदाम पवार यांनी प्रकल्पाबाबत सविस्तर माहिती दिली.डिसेंबर महिन्यात प्रकल्पाची चाचणी घेतली जाईल व या हंगामात इथेनॉल निर्मिती सुरू होईल असे सांगण्यात आले.