जिल्हा कृषी विभागाच्या भरारी पथकाची मौजे ओझर(मिग) ता.निफाड येथे किरणा दुकानावर सापळा रचून छापा.अनधिकृत व बनावट कीटकनाशकांचा साठा जप्त.सुनिल घुमरे नाशिक विभागीय प्रतिनि धी
किटकनाशक कायदे अंतर्गत फिर्याद ओझर पोलीस स्टेशन येथे दाखल दिनांक 28 सप्टेंबर 2021 रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सकाळी 10.00 वाजेच्या दरम्यान मौजे ओझर मिग येथील श्री.गुरुकृपा किराणा स्टोअर मधून जिल्हा कृषी विभागाचे भरारी पथकाने छापा टाकून बनावट बिगर बिलात बिना परवाना विक्री होत असलेला कीटकनाशकाचा साठा राहत्या घरातून जप्त केला.सदर साठ्यात Celphos -67 नग ; Difenconazole 25%EC -33 नग ;Cymoxanil 50% WP -42 नग; Dimethomorph 50%WP -97 नग. एवढा संशयित किटकनाशकाचा साठा आढळून आला. त्याची बाजार भावाप्रमाणे किंमत सुमारे रुपये 9 लक्ष एवढी आहे.सदर दुकानदार श्री.धनंजय पाटील हे बनावट/ बिगर बिलात किटकनाशक/बियाणे विक्रीचा परवाना नसताना अनधिकृतपणे कृषी निविष्ठा विक्री करीत असल्याचे गुप्त माहितीच्या आधारे कृषी विभागाने सापळा रचून सदर कारवाई केली असून, हस्तगत करण्यात आलेले कीटकनाशके हे प्रमुख्याने द्राक्ष बागेसाठी वापरले जातात. सदर कीटकनाशकाचे बाजार मूल्य जास्त असल्या कारणाने छुप्या पद्धतीने विक्री होत असल्याची बाब कृषी विभागाच्या निदर्शनास आली होती, त्यामुळे सदरच्या गैर प्रकारास आळा बसविण्याच्या दृष्टीने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री.विवेक सोनवणे व कृषी विकास अधिकारी श्री.रमेश शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा व तालुका भरारी पथकामार्फत अनधिकृत कीटकनाशके विक्रेत्यांची शोध मोहीम गेल्या काही दिवसांपासून घेतली जात आहे.आज जिल्हा भरारी पथकातील श्री.अभिजीत जमधडे, मोहिम अधिकारी,जिल्हा परिषद,नाशिक श्री.अभिजीत घुमरे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, नाशिक; श्रीमती माधुरी गायकवाड, जिल्हा कृषी अधिकारी(सा.), जिल्हा परिषद, नाशिक व श्री बाळासाहेब खेडकर, कृषी अधिकारी पंचायत समिती, निफाड यांनी सापळा रचून डमी शेतकरी ग्राहकाच्या स्वरूपात जाऊन सदर कीटकनाशकाची मागणी केली व त्या नुसार श्री.धनंजय पाटील, दुकानदार यांचेकडे साठा उपलब्ध असल्याची खात्री केली . त्यानंतर पथकामार्फत घेण्यात आलेल्या दुकानाच्या व घराच्या झडती मध्ये उपरोक्त कीटकनाशकाचा साठा आढळून आला. याबाबत किटकनाशक व बियाणे कायदा अंतर्गत पोलीस ठाणे,ओझर (मिग) येथे येथे फिर्याद नोंदविण्यात आला आहे.शेतकरी बांधवांनी कृषी निविष्ठांची खरेदी करताना अधिकृत विक्रेता व बिलातच खरेदी करावी असे आवाहन नाशिक जिल्ह्याचे विभागीय कृषी सहसंचालक श्री संजीवजी पडवळ यांनी केले आहे.